नायजेरियाचे मानवाधिकार कार्यकर्ते मुबारक बाला अचानक गायब, तपासासाठी ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनलचे आवाहन

प्रश्न विचारलेले कुठल्याच धर्माला आवडत नाही. जगाच्या पाठीवरील कुठलाही धर्म, कुठलाही देश याला अपवाद नाही. सामान्यतः फेसबुक सारख्या समाजमाध्यमांवर असे प्रश्न विचारले की धर्मांधांकडून शिवीगाळ होणे, धमक्या येणे आता जवळपास रोजचेच झाले आहे. पण नायजेरियातील ‌मानवाधिकार‌ ‌कार्यकर्ते‌ मुबारक बाला यांच्या वाट्याला धर्मांधांच्या शिव्या आणि धमक्या यांच्यासोबतच आणखीही बरंच काही येत आहे.

नायजेरियातील सुपरिचित ‌मानवाधिकार‌ ‌कार्यकर्ते‌ ‌व‌ ‌Humanist‌ ‌Association‌ ‌of‌ ‌Nigeria‌ ‌चे‌ ‌अध्यक्ष‌ ‌मुबारक‌ ‌बाला‌ ‌ ‌ ‌सध्या‌ ‌कुठे‌ ‌आहेत‌ ‌?‌ ‌कसे‌ ‌आहेत‌ ‌?‌ ‌याविषयी‌ ‌कोणालाही ‌कसलीही ‌माहिती‌ ‌नाही ‌आहे.‌ ‌ ‌


बाला यांचा नेमका गुन्हा काय?
नेहमीप्रमाणे एप्रिल महिन्यातही बाला यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली. शेकडो‌ ‌वर्षांची‌ ‌परंपरा‌ ‌असलेला‌ ‌धार्मिक‌ ‌श्रद्धा‌ ‌बाला‌ ‌यांच्या‌‌या‌ ‌एक‌ ‌फेसबुक‌ ‌पोस्टने‌ ‌हादरल्या‌ ‌असाव्यात‌ ‌म्हणून‌ ‌केवळ‌ ‌एका‌ ‌फेसबुक‌ ‌पोस्ट‌ ‌साठी‌ ‌तेथील‌ ‌लोक‌ ‌त्यांना‌ ‌जीवे‌ ‌मारण्याच्या‌ ‌धमक्या‌ ‌देत‌ ‌आहेत.‌
२७‌ ‌एप्रिल‌ ‌२०२०‌ ‌ला‌ ‌एक‌ ‌लॉ‌ ‌फर्म‌ ‌एस.‌ ‌एस.‌ ‌उमर‌ ‌अँड‌ ‌को‌. ने ‌बाला‌ ‌यांच्यावर ‌ ‌कलम‌ ‌२६(१)‌ ‌नुसार‌ ‌गुन्हा‌ ‌
दाखल‌ ‌केला.‌
२८‌ ‌एप्रिल‌ ‌२०२०‌ ‌ला‌ ‌अचानक‌ ‌मुबारक‌ ‌बाला‌ ‌यांच्या‌ ‌घरी‌ ‌कानो‌ ‌राज्याचे‌ ‌काही‌ ‌पोलीस‌ ‌आले व त्यांना घेऊन गेले,‌ ‌त्या‌ ‌पोलिसांजवळ‌ ‌कुठलेही‌ ‌वॉरंट‌ ‌नव्हते,‌ ‌ते पोलीस गणवेशात सुद्धा नव्हते.‌ ‌कदुना‌ ‌राज्याच्या‌ ‌पोलीस‌ कमिशनरांनी ‌दिलेल्या‌ ‌माहितीनुसार‌ ‌काही‌ ‌दिवस‌ ‌कदुना‌ ‌पोलिसांच्या‌ ‌ताब्यात‌ ‌असलेले‌ ‌बाला‌ ‌नंतर‌ ‌कानो‌ ‌पोलिसांच्या‌ ‌ताब्यात‌ ‌देण्यात‌ ‌आले.‌ ‌पण‌ ‌कानो‌ ‌पोलिसांनी‌ ‌बाला‌ ‌त्यांच्या‌ ‌ताब्यात‌ ‌असण्याची‌ ‌कोणतीही‌ ‌पुष्टी‌ ‌दिली‌ ‌नाही‌ ‌असे बाला यांच्या वकिलांचे म्हणणे आहे.

फेसबुक पोस्टद्वारे बाला यांनी आमच्या‌ ‌धार्मिक‌ ‌भावना‌ ‌दुखावल्याचे‌ ‌आरोप‌ ‌त्यांनी‌ ‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌ ‌
पण बाला‌ ‌यांना‌ ‌झालेली‌ ‌अटक‌ ‌ही‌ ‌या‌ ‌कलमाखाली‌ ‌झाली‌ ‌आहे‌ ‌का‌ ‌?‌ ‌याविषयी‌ ‌पण‌ ‌कुठलीच‌ ‌माहिती‌ ‌उपलब्ध‌ ‌करून‌ ‌देण्यात‌ ‌आली‌ ‌नाही‌ ‌आहे,‌ ‌जेव्हा‌ ‌की‌ ‌नायजेरियाच्या‌ ‌संविधानानुसार‌ ‌कुठल्याही‌ ‌अटकेनंतर‌ ‌२४‌ ‌तासांच्या ‌आत‌ ‌अटकेची‌ ‌कारणे ‌लेखी‌ ‌स्वरूपात‌ ‌देणे‌ ‌बंधनकारक‌ ‌आहे.‌ ‌ ‌


या‌ ‌प्रकरणाची‌ ‌गंभीरता‌ ‌अधिक‌ ‌वाढते‌ ‌जेव्हा‌ ‌या‌ ‌धमक्या‌ ‌देण्यामध्ये‌ ‌खुद्द‌ ‌पोलीस‌ ‌कार्यालयातील‌ ‌लोकच‌ ‌सहभागी‌ ‌असतात.‌ ‌सहारा‌ ‌रिपोर्टर्स‌ ‌ने‌ ‌दिलेल्या‌ ‌माहितीनुसार‌ ‌बाऊची‌ ‌राज्य‌ ‌पोलिसातील‌ ‌एक‌ ‌सार्जंट‌ ‌स्वतः‌ ‌मुबारक‌ ‌बाला‌ ‌यांना‌ ‌धमक्या‌ ‌देत‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पोलीस‌ ‌अधिकाऱ्याचे‌ ‌फेसबुक‌ ‌वर‌ ‌एक‌ ‌फेक‌ ‌अकाउंट‌ ‌आहे‌ ‌व‌ ‌या‌ ‌अकाउंट‌ ‌द्वारे‌ ‌तो‌ ‌सतत‌ ‌द्वेषपूर्ण‌ ‌व‌ ‌धार्मिक‌ ‌तेढ‌ ‌वाढविणारे‌ ‌मेसेज‌ ‌पसरवित ‌असतो.‌ ‌मुबारक‌ ‌बाला‌ ‌यांचे‌ ‌फेसबुक‌ ‌अकाउंट‌ ‌बंद‌ ‌करावे‌ ‌म्हणून‌ ‌एक‌ ‌ऑनलाईन‌ ‌याचिका‌ ‌पण‌ ‌Change.org‌ ‌या‌ ‌वेबसाईट‌ ‌वर‌ ‌दाखल‌ ‌करण्यात‌ ‌आली‌ ‌होती‌ ‌.‌ ‌या‌ ‌याचिकेवर‌ ‌१७०००‌ ‌जणांनी‌ ‌सह्या ‌केल्या‌ ‌होत्या‌ ‌हे‌ ‌विशेष.‌ ‌अर्थातच‌ ‌Change.org‌ ‌नी‌ ‌ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी याचिका‌ ‌रद्द‌ ‌केली.‌ ‌ ‌
बाला यांच्यावर ‌धर्मांध चांगलेच भडकले आहेत, ज्या‌ ‌पोलीस‌ ‌स्टेशन‌ ‌मध्ये‌ ‌बाला‌ ‌असतील‌ ‌ते‌ ‌पोलीस‌ ‌स्टेशन‌ ‌जाळून‌ ‌टाकू‌ ‌असे‌ ‌म्हणण्यापर्यंत‌ त्यांची ‌मजल‌ ‌गेली‌ ‌आहे.‌ ‌

मुबारक‌ ‌बाला‌ ‌यांच्याविषयी‌ ‌थोडेसे ‌ ‌
मुबारक‌ ‌बाला‌ ‌यांचा‌ ‌जन्म‌ ‌नायजेरियातील‌ ‌कानो‌ ‌राज्यात‌ ‌१९८४‌ ‌साली‌ ‌झाला.‌ ‌ते‌ ‌एक‌ ‌केमिकल‌ ‌इंजिनिअर‌ ‌आहेत.‌ ‌
त्यांचे‌ ‌नाव‌ ‌मानवाधिकार‌ ‌चळवळीत‌ ‌चांगलेच‌ ‌परिचित‌ ‌आहे.‌ ‌याशिवाय‌ ‌Humanist‌ ‌Association‌ ‌of‌ ‌Nigeria‌ ‌या‌ ‌संघटनेचे‌ ‌ते‌ ‌अध्यक्ष‌ ‌आहेत‌ ‌
‌ ‌याआधी २०१४ मध्ये बाला यांना जबरदस्ती एका हॉस्पिटलच्या मनोरुग्ण विभागात उपचारांसाठी ठेवण्यात आले. बाला यांना अश्या उपचाराची गरज आहे असे सरकारला वाटण्यामागचे कारण होते, त्यांचे “नास्तिकत्व”. आणि बाला यांनी जेव्हा उघडपणे अशी नास्तिक असण्याची भूमिका घेतली तेव्हा त्यांना त्याची कठोरात कठोर शिक्षा मिळावी म्हणून सर्वात जास्त प्रयत्न केलेत ते खुद्द बाला यांच्या वडिलांनी.
योगायोगाने ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना मनोरुग्ण ठरवून ठेवण्यात आले होते त्या हॉस्पिटलमध्ये पुढील काही दिवसांत संप झाला, या संपामुळे बऱ्याच रुग्णांची तिथून सुटका करण्यात आली या सुटका झालेल्यांमध्ये मुबारक बाला यांचीही सुटका झाली आणि ते पुढच्या त्रासातून वाचले.

नायजेरियातील धर्म-स्वातंत्र्याची सद्यस्थिती
नायजेरियातील जवळपास ५०% लोक मुस्लिम, ४०% ख्रिस्ती आणि १०% आदिवासी किंवा इतर धर्मांचे आहेत. तिथे निधर्मी लोकांना बऱ्याच अडचणींना समोर जावे लागते.याचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे तेथील नास्तिक व निधर्मी संघटनांना नोंदणी करून कायदेशीर स्वरूप मिळावे यासाठीच १७ वर्षे संघर्ष करावा लागला. नास्तिक हे असे अल्पसंख्याक आहेत की ज्यांचे शोषण फक्त घराबाहेरच होते असे नाही तर ते बहुतेकदा घरातूनच सुरु होते. ‘धर्मत्याग’ व ‘ईशनिंदा’ या दोन्ही गोष्टी तिथे कायद्याने निषिद्ध आहेत व त्यांसाठी असलेली शिक्षा ही मृत्यदंडाची आहे.

वस्तुतः नायजेरिया हा देश धर्मनिरपेक्ष आहे. देश म्हणून नायजेरियाचा कुठलाही असा अधिकृत धर्म नसला तरी तेथील संविधान राज्यांना स्वतःचे शरिया न्यायालय चालविण्याचे अधिकार देतो. त्यामुळे काही राज्यांमध्ये नागरिकांवर शरियाचे पालन बंधनकारक आहे तर काही राज्यांमध्ये ते ऐच्छिक आहे. त्यातही परत प्रत्येक राज्य वेगवेगळ्या प्रमाणात आणि प्रकारे या कायद्याची अंमलबजावणी करते. राज्यांतील शरिया न्यायालयांना ईशनिंदेसाठी कितीही कठोर अगदी देहदंडाची शिक्षा देण्याचे स्वातंत्र्य आहे.

असे असले तरी नायजेरियाच्या संविधानाचे सेक्शन ३८ आणि ३९ नागरिकांना विचारांचे, अभिव्यक्तीचे आणि धार्मिक स्वातंत्र्य देते.

ज्या कानो राज्यात मुबारक बाला यांच्यावर खटला चालण्याची शक्यता आहे, त्या राज्याचा या बाबतील परिस्थिती काही फार आशादायक नाही.
‌२०१६ मध्ये याच राज्यातील शरिया न्यायालयाने एका मौलवीला व त्यांच्या ५ अनुयायांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. ईशनिंदेची फाशीची शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ होती. जगभरातील देशांमध्ये उत्तोरोत्तर वाढत जाणाऱ्या धार्मिक उन्मादाची ही एक प्रकारे खूणच आहे.
बरं अश्या धर्माने प्रदूषित न्याय व्यवस्थेतून तुम्ही कसे बसे वाचला तरी धर्माधांच्या तावडीतून तुमची सुटका होईलच असे काही नाही.२०१६ मध्ये एका ख्रिश्चन महिलेला ईशनिंदेच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यावरही धर्मांधांनी तिची हत्या याच कानो राज्यात केली आहे .

या अश्या परिस्थितीत Humanist‌ ‌International‌ ‌चे नायजेरियातील व जगभरातील कार्यकर्ते मुबारक बाला यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी ‌मुबारक बाला यांच्या संदर्भात‌ ‌नायजेरियन सरकारकडे काही‌ ‌मागण्या‌ ‌केल्या‌ ‌आहेत. ‌

‌१)‌ ‌बाला‌ ‌यांच्या‌ ‌सद्यस्थितीविषयी‌ ‌सरकारने‌ ताबडतोब ‌माहिती‌ ‌द्यावी.‌ ‌ ‌
जर‌ ‌पहिल्या‌ ‌२४‌ ‌तासांत‌ ‌त्यांच्यावर‌ ‌कुठलाही‌ ‌गुन्हा‌ ‌दाखल‌ ‌झाला‌ ‌नसेल,‌ ‌तर‌ ‌त्यांना‌ ‌ताबोडतोब‌ ‌सोडून‌ ‌देण्यात‌ ‌यावे.‌ ‌ ‌
२)‌ ‌बाला‌ ‌यांना‌ ‌थेट‌ ‌आणि‌ मोफत‌ ‌‌कायदेशीर‌ ‌साहाय्य‌ ‌उपलब्ध‌ ‌करुन‌ ‌देण्यात‌ ‌यावे.‌ ‌
३)‌ ‌तुरुंगात‌ ‌असतांना‌ ‌बाला‌ ‌यांच्या‌ ‌आरोग्याची‌ ‌व‌ ‌सुरक्षिततेची‌ ‌संपुर्ण‌ ‌हमी ‌सरकारने‌ ‌द्यावी.‌ ‌खासकरून‌ ‌आता‌ ‌जेव्हा‌ ‌की‌ ‌बाला‌ ‌यांना‌ ‌तुरुंगात‌ ‌असल्याने‌ ‌कोरोना‌‌च्या‌ ‌संसर्गाचा‌ ‌अधिक‌ ‌धोका‌ ‌संभवतो.‌ ‌ ‌
४)‌ ‌बाला‌ ‌यांच्यावर‌ ‌जर‌ ‌खटला‌ ‌चालणार‌ ‌असेल‌ ‌तर‌ ‌तो‌ ‌लागोस‌ ‌किंवा‌ ‌तश्या‌ ‌एखाद्या‌ ‌तटस्थ‌ ‌राज्यात‌ ‌चालविण्यात‌ ‌यावा‌ ‌जेणेकरून‌ ‌तो‌ ‌निष्पक्षरीत्या‌ ‌चालवला जाईल ‌व‌ योग्य ‌न्याय‌ ‌होईल.‌ ‌ ‌

Humanist‌ ‌International‌ ने‌ मुबारक बाला यांच्यासाठी शक्य त्या सर्व प्रकारे आवाज उठवण्याचे आवाहन जगभरातील सर्व मानवतावादी, विवेकवादी लोकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *